बारामती : महान्यूज लाईव्ह
भारतामध्ये पहिल्यांदाच एका इन्क्युबेटरमधून मोराच्या पिल्लाचा जन्म झाल्याची घटना घडली आहे. पिंगोरी येथे महाराष्ट्र वनविभाग आणि इला फौंडेशन यांच्यामाध्यमातून चालविल्या जाणाऱ्या इला ट्रांझिस्ट ट्रीटमेंट सेंटर मध्ये चार मोराची पिल्ले जन्माला आली आहेत.
इला फौंडेशनच्या या केंद्रात कृत्रिमरित्या अंडी उबवणी करणाऱ्या पेटीत ही लांडोरीची ही अंडी ठेवण्यात आली होती. त्यातून मोराची पिल्लांचा जन्म झाला आहे.
लांडोरीची अंडी बरेचवेळा शेतकरी कोंबडीच्या अंड्यासोबत उबविण्यास ठेवतात. परंतू कोंबडीने उबवूनही ही अंडी निकामी होतात. लांडोरीच्या अंड्यांचा आकार मोठा असल्याने असे होत असल्याची शक्यता वर्तवली जाते.
मोर पक्षाची अंडी हाताळण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे कुठेही असे अंडे सापडले तर त्याला हात लावू नये असेही या निमित्ताने सांगण्यात आले आहे. .