फलटण : महान्यूज लाईव्ह
शितल अहिवळे
फलटण शहर व तालुक्यात उत्साहाने साजरी केली जाणारी प्रभू श्रीरामांची रथयात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने रद्द करण्यात आली आहे. ही माहिती फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
तिथीनूसार साजरी होणारी ही यात्रा रविवार दि. ५ डिसेंबर रोजी होणार होती. परंतू साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. या आदेशानूसार यात्रा रद्द करण्यात आलेली असून भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.