मुंबई : महान्यूज लाईव्ह
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या त्यांच्याच सर्बियाच्या वकिलातीने घरचा आहेर दिला आहे. सर्बियाच्या पाकीस्तानी वकिलातीच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून आज एक व्टिट करण्यात आले, त्यामुळे सगळीकडे पाकिस्तानची टर उडवली जात आहे.
या व्टिटरमध्ये म्हणले आहे. ” इम्रान खान, रेकार्डब्रेक महागाई लक्षात घेता आम्ही किती काळ शांत रहायचे आणि काम करायचे , मागील तीन महिने आमचा पगार मिळालेला नाही, आमच्या मुलांना शाळेतून फी न भरल्याने काढून टाकले जात आहे. हाच आपला नया पाकिस्तान आहे का ? “
यानंतरच्या व्टिटमध्ये ” मी क्षमा मारतो, इम्रान खान, पण माझ्यापुढे दुसरा इलाजच नाही. ” असे म्हणले आहे.
ज्या व्टिटर हॅंडलवरून हे व्टिट झाले आहे. ते पाकिस्तानी वकिलातीचे ब्ल्यू टीक असलेले अधिकृत व्टिटर हॅंडल आहे.
या व्टिटवर आलेल्या प्रतिक्रियाही मजेदार आहेत.
हे व्टिटर कोण चालवत आहे, असे काही जण विचारत आहेत.
वकिलातीची सगळी संपत्ती विका आणी परदेशात स्थानिक व्हा, असे आणखी एकाने म्हणले आहे.
पाकिस्तानमध्ये गेल्या ७० वर्षात नव्हती इतकी महागाई वाढलेली आहे. महागाईविरोधात आंदोलने होत आहेत. अन्यधान्याची किंमतीत दुप्पट वाढ झालेली आहे. तुप, तेल, साखर, पीठ, अंडी सगळेच प्रचंड महागले आहे.
महागाई, आर्थिक गैरव्यवस्थापन, बेरोजगारी सारखे प्रश्न पाकिस्तानपुढे उभे आहेत. केवळ गरीबच नाही तर पांढरपेशा वर्गातील नोकरदारांनाही त्याची झळ पोचते आहे.