नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
लसीकरणाचे क्रेडीट घेण्यासाठी प्रत्येक प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो छापलेला आहे. अशाप्रकारे लसीकरणाचे श्रेय घेत असाल तर मृत्यूंची सुद्धा जबाबदारी घ्या अशी खरमरीत टिका खासदार अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेत केली.
ते आज लोकसभेच्या चर्चेत बोलत होते. कोणत्याही युद्धात सेनापतीने सर्व संकटात पुढे उभे राहून सामना करणे आवश्यक आहे. आपले सेनापती म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी मृत्यूसारख्या गोष्टींची जबाबदारी घेऊन त्यावर उपाययोजना करण्यावर भर दिला पाहिजे असेही कोल्हे म्हणाले.
याच चर्चेत बोलताना खासदार सुप्रिया सूळे यांनी , लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो असल्यास राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो का नाही ? , असा प्रश्न उपस्थित केला.