बारामती : महान्यूज लाईव्ह
जागतिक स्तरावर भारतीयांना सुखावणारी आणखी एक बातमी आहे. जागतिक बॅंकेत मुख्य अर्थशास्त्री म्हणून कार्यरत असलेल्या गीता गोपीनाथ लवकरच या संस्थेच्या पहिल्या उपकार्यकारी संचालक म्हणून काम करताना दिसतील. जागतिक बॅंकेतील हे दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे.
व्टिटरच्या मुख्य कार्यकारी पदी नुकतेच पराग अग्रवाल यांची नियुक्ती झाली. यानंतर आणखी एक भारतीयाची जागतिक स्तरावरील संस्थेत सर्वोच्च पदावर निवड होणार आहे.
जागतिक बॅंकेच्या प्रमुख ख्त्रिस्तालिना जॉजिव्हा यांनी व्टिटरवरून ही माहिती दिली. या पदासाठी गीता गोपीनाथ या योग्य व्यक्ती असल्याचे त्यांनी दुसऱ्या व्टिटमध्ये म्हणले आहे.
गीता गोपीनाथ यांनी २०१८ मध्ये जागतिक बॅंकेच्या मुख्य अर्थशास्त्री म्हणून कामास सुरुवात केली. त्यांचा जन्म भारतात झाला आहे, परंतू त्या आता अमेरिकेच्या नागरीक आहेत.