मुंबई : महान्यूज लाईव्ह
ओमिक्रॉनचे नवे रुप घेऊन कोरोना विषाणूने पुम्हा जगात दहशत पसरविण्यास सुरुवात केली असली तरी जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत दिलासा देणारी माहिती दिलेली आहे.
त्यातील पहिले म्हणजे आजपर्यंत जगात कोरोनाच्या कोमिक्रॉन प्रकारामुळे एकही मृत्यू झालेला नाही. ओमिक्रॉन कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सौम्य किंवा अतीसौम्य स्वरुपाची लक्षणे दिसून येत आहेत. सध्या वापरात असलेल्या लसीदेखील तुम्हाला ओमिक्रॉन कोरोनापासून वाचण्यासाठी आणि मृत्यूपासून दूर राहण्यासाठी मदत करू शकतात.
मात्र हा दावा जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आधारावर केलेला आहे हे स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेतही अद्याप ओमीक्रॉन कोरोनाचे १७२ रुग्ण आढळून आले आहेत. आणि रुग्णांमध्येही अगदी सौम्य लक्षण दिसून आली आहेत.
मात्र वरील सर्व दावे खरे ठरविण्याइतका स्पष्ट पुरावा अद्याप हातात नाही. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे भाग आहे.