बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनाचा ओमीक्रॉन विषाणू भारतात पोचला आहे. कर्नाटकातील दोन जणांना ओमीक्रॉन कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे केंद्रसरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या पत्रकार परिषदेत लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. दोन्ही रुग्ण कर्नाटकातील असून एकजण ६६ वर्षाचा तर दुसरा ४६ वर्षाचा आहे. या दोघांनाही ओमीक्रॉन प्रकारातील कोरोना झाल्याचे संबंधित प्रयोगशाळेकडून सांगण्यात आले आहे. या दोघांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटवून त्यांची कोरोना चाचणी घेतली जात आहे.