किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वर्ग प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला कालच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संस्था प्रतिनिधी प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता दुसरीकडे छत्रपती कारखान्याचे संचालक व सणसर चे सरपंच रंजीत सिंह निंबाळकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून आज पुण्यातील बँकेच्या निवडणूक कार्यालयात अजित पवार यांनी दोन अर्ज दाखल केले. पहिल्या उमेदवारी अर्जावर सतीश तावरे यांनी सूचक; तर दिपक मलगुंडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. दुसर्या उमेदवारी अर्जावर अमोल गावडे यांनी सूचक तर अनुमोदक म्हणून लालासाहेब नलवडे यांनी स्वाक्षरी केली.
आज बुधवारी अर्ज दाखल करताना बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, नगरसेवक सुधीर पानसरे उपस्थित होते. दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज संस्था प्रवर्गातून भरला. दत्तात्रय भरणे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदापासून झाली. गेली अनेक वर्ष दत्तात्रय भरणे हे बँकेच्या संचालक पदी कार्यरत आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादीकडून इंदापूर तालुक्यातील सणसर चे सरपंच व छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजीत निंबाळकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचनेनुसार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती रणजीतसिंह निंबाळकर यांनी दिली. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, छत्रपती कारखान्याचे संचालक रसिक सरक, अशोक काळे, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन निंबाळकर, गोपी भोईटे, बाबासाहेब भोईटे, रोहित निंबाळकर, जगदीश कदम आदी उपस्थित होते.