बारामती : महान्यूज लाईव्ह
माझ्या आईला योग्य सल्ला का दिला नाही ? मला जन्मत: ” स्पाईना बिडिफा ” आहे. मला जन्म देण्याचा चुकीचा सल्ला माझ्या आईला तिच्या डॉक्टरांनी दिला. आता या आजारामुळे मला भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. याला जबाबदार माझ्या आईला चुकीचा सल्ला देणारे डॉक्टर आहेत. त्यांनी यासाठी नुकसानभरपाई दिली पाहिजे असा अजब दावा इंग्लडमधील एक महिलेने न्यायालयात केला आहे. विशेष म्हणजे न्यायालयानेही हा दावा मान्य करून या महिलेला नुकसानभरपाई द्यावी असा आदेश दिला आहे. आता ही नुकसानभरपाई किती असावी यावर खल सुरू आहे.
एव्ही ट्रयुम्स ही एक शो जंपर आहे. जिला जन्मत: अशी व्याधी आहे, ज्यामुळे तिला काहीवेळेस २४ तास दवाखान्यात पडून रहावे लागते.
वीस वर्षापूर्वी झालेल्या तिच्या जन्मावेळी तिच्या आईचे वैद्यकीय सल्लागार डॉ. फिलीफ मिचेल यांना तिने चुकीचा सल्ला दिल्याप्रकरणी न्यायालयासमोर उभे केले. एव्हीच्या वेळी तिच्या आईचे हेच डॉक्टर होते. एव्हीने न्यायालयात असे सांगितले की, जर या डॉक्टरांनी तिच्या आईला बाळाला असणारा स्पाईना बिडिकाचा धोका कमी करण्यासाठी फॉसिल अॅसीडचा पूरक आहार घेण्याचा सल्ला दिला असता तर कदाचित तिच्या आईने तिला जन्म देण्याचा विचार सोडून दिला असता. तस झाले असते तर माझा ( ईव्हचा ) जन्मच झाला नसता.
लंडन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोजालिंड को क्यूसी यांनी ईव्हाचे म्हणणे योग्य ठरवले. योग्य सल्ला मिळाला असता तर ईव्हच्या आईने गर्भधारणा पुढे ढकलली असती, आणि त्यानंतर झालेल्या गर्भधारणेतून एक निरोगी मुलाचा जन्म झाला असता. न्यायाधीशांनी ईव्हला नुकसानभरपाई देण्यासाठी यो्ग्य ठरविले.
याच खटल्यादरम्यान एव्ही ट्रयुम्सच्या आईने न्यायालयात तिला डॉक्टरांनी योग्य सल्ला दिला नसल्याचा दावा केला होता.
हा एक ऐतिहासिक निवाडा मानला जात आहे. जर हा निवाडा योग्य ठरला तर, जर जन्मत: व्याधी असलेल्या बाळाचा जन्म झाला व त्यासाठी गर्भधारणेपूर्वीच्या चुकीचा सल्ला जबाबदार ठरला तर संबंधित वैद्यकीय सल्लागार नुकसानभरपाईस पात्र ठरू शकतो.