राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जन्मगावी केला गौरव.
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड येथील पत्रकार
अमरसिंह हनुमनसिंह परदेशी यांना महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार व पर्यावरण प्रेमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांचे जन्मगाव खानवडी (ता.पुरंदर,जि.पुणे ) येथे १४ वे महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमात दौंड तालुक्यातील वरवंड येथील पत्रकार अमरसिंह परदेशी यांनी सामाजिक,पर्यावरण तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार व पर्यावरण प्रेमी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
८९ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक सीताराम नरके, मुख्य संयोजक दशरथ यादव, स्वागताध्यक्ष अजिंक्य टेकवडे, सुनिल धिवार, चित्रपट दिर्घदर्शक आभिनेते प्रकाश धिंडले, गायक उमेश गवळी आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एम.जी.शेलार, राजेंद्र झेंडे, संजय सोनवणे, दिपक पवार, अनिल गायकवाड, बहुजन हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने आदी उपस्थित होते.