बारामती : महान्यूज लाईव्ह
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून झालेल्या आंदोलनात काही जणांचा बळी गेला. या आंदोलनातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयाची मदत देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतलेले आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर अनेक आंदोलने झाली. या आंदोलनात ३४ जणांना मरण पत्करावे लागले. या सर्व आंदोलकांच्या वारसांना ही मदत दिली जाणार आहे. मृत झालेल्या व्यक्तीची जागा कोणी घेऊ शकत नाही, परंतू या मदतीमुळे त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचेही आभार मानले आहेत.
पार्थ पवार यांनी व्टिट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.