बारामती : महान्यूज लाईव्ह
शासकीय, निमशासकीय तसेच गैरशासकीय कर्मचारी यांना कोविड लस घेणे सक्तीचे आहे का ? माहिती अधिकारात विचारलेल्या या प्रश्नाचे ” नाही ” असे उत्तर शासनाकडून मिळालेले आहे. याचप्रमाणे कोविड लस न घेतल्यास शासकीय तसेच गैरसरकारी कर्मचारी यांचे वेतन कपात केले जाईल का या प्रश्नाचेही ” नाही ” असे उत्तर देण्यात आले आहे.
नागपूर येथील प्रेमराज बोबडे यांनी माहिती अधिकारातंर्गत जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती मागितली होती. त्यावर जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे शासकीय जन माहिती अधिकारी रविराज बाविस्कर यांच्या सहीने ही माहिती देण्यात आलेली आहे.