मुंबई : महान्यूज लाईव्ह
सोमवारी आसाममध्ये एका विद्यार्थी नेत्याची ५० जणांच्या घोळक्याने केलेल्या मारहाणीत हत्या झाली. या मारहाणीचा मु्ख्य आरोपी असलेला आरोपी बुधवारी (आज ) पोलिसांच्या ताब्यात असतानाच पोलिसांच्या गाडीखाली येवून मरण पावला. आसाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सदर आरोपीने पोलिसांच्या हातून पळ काढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तो मागे असणाऱ्या पोलिसांच्याच दुसऱ्या गाडीखाली येऊन मरण पावला.
सोमवारी आसाम विद्यार्थी संघटनेचा नेता अनिमेश बियून हा त्याच्या दोन सहकाऱ्यांसह जोरहाट शहरात गाडीवरून जात असताना काही जणांना त्यांना अडवले. एका वृद्ध व्यक्तीला त्यांच्या गाडीचा धक्का लावल्याचा आरोप करत त्यांना मारहाण सुरू झाली. त्यानंतर तेथे ५० जणांचा जमाव जमला, त्या सगळ्यांनी केलेल्या मारहाणीत अनिमेशचा मृत्यू झाला तर त्याचे सहकारी जखमी झाले.
पोलिसांनी याप्रकरणी १३ जणांना अटक केली. त्यामध्ये ज्याला धक्का लागल्याचा आरोप होता त्या वृद्धाचा मुलगा नीरज दास देखील होता. नीरज हा अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. असे अंमली पदार्थांचा साठा दाखविण्यासाठीच नीरजला पोलीस आपल्या गाडीतून घेऊन जात होते, त्यावेळी हा अपघात घडला असे पोलिसांचे म्हणणे आहे.
गेल्या सहा महिन्यात पोलिस कोठडीतून पळत असताना ४० जण जखमी झाले आहेत, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. अचानक वाढलेले हे प्रमाण आसाम पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उत्पन्न करणारे आहे.
आसामचे विशेष पोलिस महासंचालक जी. पी. सिंग यांनी केलेले ” for every action, there is an equal and opposite reaction – Newton,s Low ” हे व्टिट या शंकेलाच बळकटी देणारे आहे.