मुंबई : महान्यूज लाईव्ह
आज मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच अंदमानच्या समुद्रातही असाच कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून यातून शुक्रवारपर्यंत बंगालच्या खाडीवर चक्रीवादळ तयार होऊ शकते. शनिवारी सकाळपर्यंत हे चक्रीवादळ आंध्रप्रदेश व ओरिसाच्या किनाऱ्यावर येऊन धडकण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.