बारामती : महान्यूज लाईव्ह
दक्षिण आफ्रिका किंवा इतर ओमिक्रॉन कोरानासाठी धोकादायक देशातून महाराष्ट्रात आलेले ६ जण कोराना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पुणे येथे प्रत्येकी एक, तर नाईजेरियातून आलेले दोघे जण पिंपरी चिंचवड येथे कोराना संक्रमित आढळले आहेत.
परंतू यांना झालेला कोरोना ओमिक्रॉन प्रकारातील आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान मागील २४ तासात महाराष्ट्रात ६७८ नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत, तर ३५ जणांचा मृत्यू झालेला आहे.