बारामती : महान्यूज लाईव्ह
प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडे हिने नुकतेच लग्न केले आहे. फरहान शेख या तिच्या बऱ्याच काळापासूनच्या मित्रासोबत तिने लग्नगाठ बांधली आहे. शाल्मली ही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. ” सूर नवा ध्यास नवा ” आणि ” इंडियन आयडॉल ज्युनिअर ” या शोमध्ये तिने परीक्षकाची भूमिका पार पाडली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
हे लग्न मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत घरच्या घरीच पार पडले.