पुणे : महान्यूज लाईव्ह
नव्या कोरोना विषाणूमुळे सध्या दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांकडे जास्तच लक्ष दिले जात आहे. थेट दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या, किंवा दक्षिण आफ्रिकेच्या मार्गाने आलेल्या प्रवाशांच्या कोरोनाच्या सर्व चाचण्या केल्या जात आहेत. आता तर दक्षिण आफ्रिकेतून विमानसेवा बंद केली असली तरी ही विमानसेवा बंद करण्यापूर्वी आलेल्या प्रवाशांची माहिती घेतली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका प्रवाशामुळे आता प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. हा प्रवासी सध्या त्याच्या घरीच असून तो तिथेच कॉरंटाईन झालेला आहे. त्याची कोरोना चाचणी केली असून त्याचा अहवालाची प्रतिक्षा आहे. या अहवालानंतर या व्यक्तीला कोरोना आहे हे कळेल. त्यानंतर हा कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार आहे की नाही याची तपासणी केली जाईल.
ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत प्रशासनाची चिंता वाढलेली असणार आहे.