मुंबई : महान्यूज लाईव्ह
भिंवडी येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. येथील अन्सारी मॅरेज हॉल येथील हा व्हिडिओ आहे. लग्नाला आलेले पाहूणे जेवणावर ताव मारताना दिसत आहेत.

आता तुम्हा म्हणाल लग्नाला आलेले पाहूणे जेवणावर ताव मारणारच की, पण या व्हिडिओत दिसतय की पाहुणे जेवताहेत त्याच्या मागेच मोठी आग लागलेली दिसते आहे. पण पाहुणे मात्र जेवायच सोडत नाहीत. या आगीत दोन दुचाकीस्वार होरपळले. मात्र लग्नाचे वऱ्हाडी मात्र निवांत जेवत राहिले.