बारामती : महान्यूज लाईव्ह
भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांच्याकडे आता व्टिटरची सूत्रे असणार आहे. पराग अग्रवाल यांची व्टिटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुंबई आयटीआयमध्ये पराग अग्रवाल यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांचे शालेय शिक्षण अॅटोमिक एनर्जी सेंन्ट्रल स्कुल येथे झाले आहे. पराग यांनी २०११ मध्ये व्टिटर मध्ये कामास सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांना मायक्रोसॉफ्ट, एटी & टी आणि याहूमध्येही काम केले होते. वरील कंपन्यांमधील त्यांचे काम संशोधनाच्या स्वरुपाचे होते. व्टिटरमध्ये त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेवर काम करायला सुरुवात केली होती. ते सध्या व्टिटरमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम करत होते. व्टिटरे मावळते सीईओ जॅक डोरसी यांनी त्यांना व्टिटरमध्ये आणले होते.
जागतिक स्तरावरील कंपन्यांमध्ये भारतीय मोठया पदावर दिसू लागले आहेत. सुंदर पिचोरी, सत्या नाडेल यांच्या रांगेत आता पराग अग्रवालही बसले आहेत.