मुंबई : महान्यूज लाईव्ह
ज्याप्रमाणे लोकभावना लक्षात घेऊन कृषी कायदे मागे घेतले, तशाच लोकभावना लक्षात घेऊन नागरिकता दुरुस्ती कायदाही मागे घेण्यात यावा अशी मागणी भाजपाच्याच एका सहयोगी पक्षाने केली आहे. मेघालयातील नॅशनल पीपल्स पार्टीच्या नेत्या अॅगाथा संगमा यांनी भाजपानेच बोलावलेल्या भाजपा सहयोगी पक्षांच्या बैठकीत त्यांनी राजनाथ सिंह यांच्यासमोर ही मागणी केली. त्याचबरोबर केंद्र सरकाने बोलाविलेल्या सर्व पक्षांच्या बैठकीतही त्यांनी ही मागणी केली.
जेव्हापासून केंद्रसरकारने लोकभावना लक्षात घेऊन तीनही कृषी कायदे मागे घेतले, तेव्हापासून ईशान्य भारतातील लोकभावनांचा विचार करून सीएए कायदा रद्द करावा असे अॅगाथा संगमा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मी केवळ माझ्या पक्षाच्या वतीने आणि ईशान्येतील नागरिकांच्या वतीने ही मागणी केली आहे. परंतू केवळ माझ्याच पक्षाचा हा विचार नाही तर, ईशान्येतील इतरही काही पक्षांचा हा विचार आहे. असेही त्यांनी सांगितले.
डिसेंबर २०१९ मध्ये मंजूर झालेल्या नागरिकता दुरुस्ती कायद्याला तेव्हापासून विरोधाचा सामना करावा लागत आहे.