मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुंबईच्या कुर्ला येथे एका रिकाम्या इमारतीत एका २० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला आहे. या इमारतीत कोणाचे येणे जाणे नव्हते. त्यामुळे ज्यावेळी येथून दुर्गंध येऊ लागला त्यावेळी ही बाब आजुबाजुला राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आली.
पोलिस ज्यावेळी येथे पोचले, त्यावेळी हा मृतदेह सडू लागला होता. या महिलेला अपहरण करून येथे आणले गेले असावे. तिथे तिच्यावर बलात्कार करुन नंतर तिचा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. अजून या महिलेची ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी बलात्कार आणि खूनाचा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
याच कुर्ला परिसरात मागच्याच महिन्यात एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्या तरुणीला अत्यंत गंभीर अवस्थेत दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.