शिरूर : महान्युज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील न्हावरे गावचे सुपुत्र किशोर राजे निंबाळकर यांची महारष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यातील न्हावरे गावचे सुपुत्र असलेले किशोर राजे निंबाळकर यांनी यापूर्वी विक्रीकर आयुक्त मुंबई, प्रशासक जिल्हा परिषद ठाणे,मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे, जिल्हाधिकारी जळगांव, जळगाव मनपा आयुक्त, राज्य शासनाच्या मदत पुनर्वसन विभागाचे सचिव, सामान्य व प्रशासन विभागाचे सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव आदी विभागात महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागातील त्यांच्या कामाचा अनुभव पाहता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
न्हावरे गावच्या विकासात किशोर राजे निंबाळकर यांची मोलाची भूमिका असून नुकतीच त्यांच्या पाठपुराव्याने पीएमपीएमल सेवा सुरू करण्यात आली आहे.परिसरातील गावच्या नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत.त्यांच्या निवडीच्या बातमीनंतर परिसरात ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.