मुंबई : महान्यूज लाईव्ह
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना त्यावेळी जोरदार झटका बसला, ज्यावेळी त्यांना आत सोडले गेले नाही, पण त्याचवेळी एका झोमॅटो डिव्हिवरी बॉयला मात्र काही न विचारता आत सोडले गेले.
हा प्रकार घडला, प्रसिद्ध कपिल शर्मा शोच्या सेटवर. स्मृती इराणी आपल्या नवीन पुस्तकाच्या प्रमोशनसाठी कपील शर्मा शोमध्ये येणार होत्या. परंतू सध्या तरी त्या या शो मध्ये येतील असे दिसत नाही. कारण घडले ते असे की, स्मृती इराणी या शोच्या एपिसोडच्या शुटींगसाठी ज्यावेळी या सेटच्या गेटवर आपल्या ड्रायव्हर आणि दोनजणांसह पोचल्या. त्यावेळी गेटवर असणाऱ्या रखवालदाराने गाडी आत सोडण्यास नकार दिला. स्मृती इराणींच्या ड्रायव्हरने, आम्ही शुटींगसाठी आलो आहोत, असेही सांगितले. पण रखवालदाराने मला आतून काही आदेश नसल्याने मी सोडू शकत नाही, असे सांगितले. मात्र याच वेळी झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय गेटवर आला, त्याला मात्र कोणतीही चौकशी न करता सोडण्यात आले.
हे पाहून स्मृती इराणी भयंकर संतापल्या. त्यांनी तिथूनच परण जाणे पसंत केले. हा सगळा प्रकार गैरसमजातून घडला आहे. परंतू यामुळे आता स्मृती इराणी कपील शर्मा शो मध्ये दिसतात की नाही याबाबत लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे. अलिकडील काळातच स्मृती इराणी यांनी आपले वजन खुपच कमी केले आहे. त्यांचे नव्या लुकमधील फोटोही सोशल मिडियावर झळकत आहेत. या रखवालदाराने अजून ते पाहिलेले दिसत नाहीत, त्यामुळेच तो स्मृती इराणींना ओळखू शकला नसावा अशाही मिम्स सोशल मिडियावर नेटिझन्स टाकत आहेत.