महान्यूज विशेष
आज परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कामगारांचे शिष्टमंडळ यांच्यात ११ वा . बैठक होणार आहे. यामध्ये एसटीच्या विलिनीकरणाबाबत निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिक पगारवाढ देण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर जास्त न ताणता एसटी कामगारांनी अंतरीम पगारवाढ स्विकारून कामावर हजर व्हावे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर नेमण्यात आलेली समिती जो अहवाल देईल, त्यानुसार पुढील कार्यवाही करू असा तोडगा निघण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात गेले दोनतीन दिवस जेष्ठ नेते शरद पवार, खासदार संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासोबत परिवहन मंत्री अनील परब खलबत करीत असल्याचे चित्र होते. त्यातून हा तोडगा पुढे आला असावा अशीही शक्यता आहे.
एसटी कामगारांची गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याबरोबरही आज बैठक होऊन यात या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे.