बारामती : महान्यूज लाईव्ह
ऑस्ट्रेलियाच्या ख्रिसमस आयलॅंडवर रस्ते बंद करण्यात आले आहेत, कारण लाखो लाल खेकडे आपल्या वार्षिक यात्रेवर निघाले आहेत. त्यांना रस्ते सुरक्षितरित्या पार करता यावेत यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर काही परिसरात माणसांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
सोशल मिडियावर या लाल खेडक्यांचे पूल पार करतानाचे दृष्य लाखो लोकांनी पाहिले आहे. हे खेडके दरवर्षी जंगलातून निघून समुद्राच्या दिशेने जात असतात. ऑस्ट्रेलियामध्ये पहिला पाऊस पडला की या वार्षिक प्रवासाला सुरुवात होते. हे खेडके जंगलातून निघून समुद्रात अंडी देण्यासाठी जात असतात. यांच्या मार्गात अडथळा येऊ नये यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार खुपच काळजी घेत असते. त्यांच्यासाठी विशेष पुल बांधलेले आहेत. या काळात या भागातील रस्त्यांवरील वाहतूक बंद केली जाते तर काही भागात माणसांना प्रवेश बंदी होते.
लाल खेकड्यांची ही यात्रा सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होते आहे.