मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील 4555 ग्रामपंचायतींच्या 7130 ग्रामपंचायत सदस्यांसाठी पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या या पदांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातील 317 ग्रामपंचायतींच्या 503 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये वेल्हे तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींच्या 65 जागा; भोर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींच्या 121 जागा; पुरंदर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या 27 जागा; बारामती तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींच्या 13 जागा;
इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या आठ जागा; जुन्नर तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींच्या 55 जागा; आंबेगाव तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींचे 55 जागा; खेड तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींच्या 49 जागा; हवेली तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या 10 जागा; मुळशी तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या 63 जागा; मावळ तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींसाठी 19 जागा; खेड तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींच्या 49 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार असून या उमेदवारी अर्जांची छाननी सात डिसेंबर रोजी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 9 डिसेंबर 2021 पर्यंत राहणार असून, मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. या मतदानाची मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे.