शिरूर : महान्युज लाईव्ह
शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथे अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी प्रतीमेचे पुजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दादापाटील फराटे, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार, घोडगंगा चे माजी संचालक दत्तात्रय फराटे, शंकरराव फराटे इनामदार यांनी आदरांजलीपर मनोगते व्यक्त केली.
यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष हनुमंत फराटे, अंकुश शितोळे, रावसाहेब जगताप, कैलास फराटे, संभाजी फराटे इनामदार, शरद चकोर, दिलीप फराटे, गणेश फराटे, दत्तात्रय जगताप, माऊली जगताप, धनंजय हांडे, नवनाथ गायकवाड, संदिप जगदाळे ,मधुकाका कुरूमकर, अमोल शितोळे, तुषार शितोळे, मुकेश साठे, नितीन फराटे, गणेश फराटे, शेखर चौगुले ,संतोष फराटे, अशोक सोनवणे आदी पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.