शिरूर : महान्यूज लाईव्ह
केंद्रीय मार्ग निधीतून शिरूर तालुक्यातील प्रलंबित रस्ते पूर्ण करण्याची मागणी जयेश शिंदे यांनी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. (Jayesh Shinde meets to Nitin Gadkari)
याबाबत मागणीचे निवेदन त्यांनी प्रत्यक्ष दिल्ली येथे भेटून दिले आहे. या दिलेल्या निवेदनानुसार, शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र वढू बुद्रूक येथे संभाजी महाराज यांची समाधी आहे. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी प्रलंबित असलेला रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे.
निमगाव म्हाळुंगी, करंजावने, भांबर्डे, बाभूळसर, सरदवाडी, धानोरे ते तळेगांव ढमढेरे या रस्त्याच्या विकासासाठी केंद्रीय मार्ग निधीतून मदत मिळावी यासाठी मागणी करण्यात आले असल्याचे जयेश शिंदे यांनी सांगितले.