ताज्या बातम्या

जय भीम चित्रपटातील नायकाला पोलिस संरक्षण

महान्यूज लाईव्ह रिपोर्ट

सध्या देशभर गाजत असलेल्या जयभीम या मूळच्या तमिळ चित्रपटाचा नायक सूर्या यास तामिळनाडू सरकारने पोलिस संरक्षण दिले आहे. जयभीम या चित्रपटाने फक्त देशातच नव्हे तर जगभरात कौतुकाचा डंका मिरवल्यानंतर आपल्याकडे उण्याचे वाटेकरी अशी एक जी म्हण आहे, ती बरोबर सत्यात उतरली असून त्याआधारेच सूर्या याला धमक्या मिळू लागल्याने त्याला पोलिस संरक्षण पुरवण्यात आले आहे.

तामिळनाडूमधील वेनियर समाजाला या चित्रपटात चुकीच्या पध्दतीने दाखवण्यात आल्याने समाजाचा मोठा अपमान झाल्याचा आरोप पट्टाली मक्कल काची या राजकीय पक्षाने केला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी या पक्षाने केल्यानंतर चित्रपट अभिनेता सूर्या याला धमक्या दिल्या जाऊ लागल्याने तामिळनाडू पोलिसांनी सूर्या यास पोलिस संरक्षण पुरवले आहे.

सूर्या याच्या त्यागराजनगर येथील घरीही पोलिस संरक्षण पुरवण्यात आले असून सूर्या याच्या कुटुंबियांनाही संरक्षण देण्यात आले आहे.

Maha News Live

Recent Posts

दौंड तालुक्यात तीन वाजेपर्यंत अवघं ३७ टक्के मतदान! अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात…

20 mins ago

आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा कथित व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्वीट! पहा व्हिडिओ!

बारामती : महान्यूज लाईव्ह इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकाला शिवीगाळ…

5 hours ago