Featured

रेशनचा काळाबाजार…..!पोलिसांनी पकडला ट्रक….!पुणे-सोलापुर हायवेवर इंदापूर तालुक्यात कारवाई…..!

महान्यूज लाईव्ह

स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळाबाजार जोरात सुरु आहे. आज इंदापूर पोलिसांनी सरडेवाडी येथील पुणे – सोलापुर हायवेवर काळ्या बाजारात विक्रीसाठी धान्य घेऊन जाणारा ट्रक पकडला आहे. याप्रकरणी चालकास अटक करून त्याच्या ताब्यातील ट्रकसह १५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी आंतरजिल्हा रॅकेटचा शोध घेणे तसेच सूत्रधाराचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली आहे.

रामचंद्र अंबादास दळवी ( वय ४३, रा. खांडवी, ता.बार्शी, जि. सोलापूर ) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांचे पोलीस पथक रात्रीचे गस्ती पथकाला सरडेवाडी टोक नाक्याजवळ अशोक लेलॅंड कंपनीच्या ट्रकमध्ये ( एचएम १३ एक्स ४७०९) पांढऱ्या रंगाच्या सोनाई कॅटलफिड लिमिटेड ( निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे लिहलेल्या प्लास्टिक बॅगमध्ये ५० किलो याप्रमाणे ५०० बॅग गव्हाचे आढळून आले. यासंदर्भात वाहन चालकास माहिती विचारली असता त्याने टाळाटाळ केली. यानंतर संशय आल्याने पोलिसांनी अधिक तपासणी केली असता स्वस्त धान्य दुकानातील धान्य या ट्रकमध्ये असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी शासन आणि जनतेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस नाईक महेंद्र पवार यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

1 day ago