महान्यूज लाईव्ह
समीर वानखेडे यांचा मी दाखविलेल्या जातीचा आणि जन्माचा दाखला जर खोटा असेल तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईन, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांकमंत्री मलीक यांनी दिले आहे. आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक आरोप केले आहेत.
समीर वानखेडे यांनी चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवली आहे. अशा बोगसगिरीविरोधात ३ ते ७ वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की त्यांची नोकरी नक्की जाईल असेही ते म्हणाले.
कार्डिला क्रुझ पार्टीतील “तो ” दाढीवाला एक आंतराराष्ट्रीय माफिया आणि खेळाडू होता. त्याची प्रेयसी बंदुकीसह हजर होती. हा खेळाडू एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा मित्र असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
एनसीबीने यापूर्वी केलेल्या ड्रग्ज रॅकेट कारवाईत अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांचीही चौकशी केली होती. पण त्यांना अटक झाली नाही. यामागे काय गौडबंगाल आहे, असा सवाल नबाब मलिक यांनी केला. याचा संबंध समीर वानखेडे यांच्या मालदीव दौऱ्याशी असल्याचे ते म्हणाले. यावेळेसच अनेक अभिनेत्रीही मालदीव येथे होत्या. हा दौरा केवळ खंडणासाठी होता असाही आरोप नबाब मलिक यांनी केला.
राज्य सरकारने कॉर्डिला क्रूझवरील पार्टीला परवानगी दिली नव्हती. पण यासाठी थेट डायरेक्टर ऑफ शिपिंग यांच्याकडून परवानगी घेण्यात आली. हे सर्व विशिष्ठ लोकांना लक्ष्य करण्यासाठी केले गेले असा आरोपही मलिक यांनी केला.