महान्यूज लाईव्ह
कितीही दिवस झाले तरी ” आदर्श प्रकरण ” अशोक चव्हाणांना सोडण्यास तयार नाही. आता देगलूर विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणावरून अशोक चव्हाणांना थेट धमकी दिली आहे.
एक मोर्चा हायकोर्टावर गेला की, तुम्ही दवडलेली फाईल पुन्हा बाहेर येईल आणि सुशीलकुमार शिंदे यांनादेखील जेलमध्ये घेऊन जाईल असा इशारादेखील प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
‘ अशोकराव बोलले वंचितच्या गाडीत पेट्रोल भाजप भरते. अशोकराव, ही चूक आयुष्यात पुन्हा करून नका. निवडणूक होऊ द्या, आमच्या गाडीत कुणी – कुणी पेट्रोल भरलं हे राहू द्या, आम्ही हायकोर्टात विचारतो, आदर्श प्रकरणात कुणाकुणाचा फ्लॅट आहे, अशोक चव्हाण आपल्याला बायको आणि् सासूबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा?” अशा कडक शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाणांवर ताशेरे ओढले आहेत.
निवडणूक म्हणले की अशी भाषणे होतच राहतात, आता अशोक चव्हाणही याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. निवडणूक झाल्यानंतर आपण काय बोललो ते प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात राहील का, ऐवढाच खरा प्रश्न आहे.