महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील सणसर ग्रामपंचायत हद्दीत कॅनॉलच्या कडेला सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर वालचंदनगर पोलिसांनी आज छापा टाकला. जुगार खेळण्याच्या साहित्यासह रोख रक्कम, मोटारसायकल असा एकुण १ लाख ८ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छाप्यात ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
संतोष भिवा जाधव , हनुमंत गोपाळ कुंभार ( रा. निंबोडी, ता. इंदापूर), दत्तात्रय गुलाब निंबाळकर, संजय बापु गर्जे ( भवानीनगर, ता.इंदापूर) , भगवान राजेंद्र आगरकर ( रा. बोरी, ता. इंदापूर) व हनुमंत दादा धोतरे ( रा. सणसर, ता.इंदापूर) अशी ताब्यात घेतलेल्या सहा जणांची नावे आहेत. तर सोमनाथ ( जंगल) प्रकाश जगताप ( रा. सणसर, ता.इंदापूर) हा पोलीसांची चाहूल लागताच पळुन गेला आहे. पुढील तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे हवालदार पाटील करीत आहेत.