शिरूर (महान्युज लाईव्ह) : न्हावरा ते पुणे स्टेशन या नव्याने सुरु झालेल्या पीएमपीएमएल बसचे पहिल्या दिवशी नागरिकांनी जोरात स्वागत केले आहे.
शिरुर तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाची ठरत असलेली पीएमपीएल बस सेवा यापुर्वी तळेगाव ढमढेरे पर्यंत सुरु होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वी कारेगाव, रांजणगाव गणपती च्या प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली होती. या दोन्ही मार्गांवर बससेवा सुरु झाल्याने अनेक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिवाय अनेकांच्या दैनंदिन प्रवासाची सोय झाली. न्हावरे ते तळेगाव ढमढेरे या रस्त्याची यापुर्वी अत्यंत दयनीय अवस्था होती, त्यामुळे प्रवाशांनी या रस्त्याने जाणे दुर्लक्षित केले होते माञ या रस्त्याने अनेकांना प्रवास करावा लागत असल्याने प्रवासी साधने उपलब्ध होत नसल्याने मोठ्या ञासाला सामोरे जावे लागत होते. माञ सध्या दर्जेदार रस्ता झाल्याने या मार्गावरुन पीएमपीएमएल सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी केली होती.अखेर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने या मार्गावरुन बस सेवा करण्याचा निर्णय घेण्यात आला.यासाठी न्हावरे येथील प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.
सोमवार(दि.२५) रोजी नव्याने बससेवेचा प्रारंभ करण्यात आला.फुलांनी सजवलेल्या बसचे न्हावरा,उरळगाव, दहिवडी,पारोडी,तळेगाव ढमढेरे व ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. बसचे चालक व वाहक यांना औक्षण करुन सत्कार करण्यात आला.
हि बस तळेगाव ते न्हावरा दरम्यान सर्व बसथांब्यावर थांबणार असुन पुणे स्टेशन ते न्हावरा दरम्यान एकुण २२ खेपा केल्या जाणार असुन नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे