महान्यूज लाईव्ह
ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने केलेले आरोप ग्राह्य धरू नयेत अशी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेली याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयात जावे लागणार आहे.
हे प्रकरण उच्च न्यायालयात असल्यामुळे याचिकेवर सुनावणीस सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. वानखेडे यांनी सत्र न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. माझी वैयक्तिक बदनामी केली जात असून सोशल मिडियावर माझ्या कुटुंबियांची माहिती उघड केली जात आहे. याचा परिणाम तपासावर होत असल्याचे वानखेडे यांनी याचिकेत म्हणले होते, त्यावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती.
मात्र सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते उच्च न्यायालयात सांगा. आता हे प्रकरण सत्र न्यायालयात नाही असे न्यायालयाने म्हणले आहे.
दरम्यान प्रभाकर साईल यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती , त्यानूसार त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.