सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
अखिल भारतीय अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशनच्या पुणे जिल्हा समितीच्या इंदापूर तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी बकुळा शेंडे यांची तर उपाध्यक्षपदी सुदर्शना भुजबळ यांची फेरनिवड झाली.
निमगाव केतकी येथील श्री संत सावतामाळी मंदिराच्या सभागृहात अंगणवाडी सेविका मदतनीस यांची बैठक झाली.यावेळी इंदापूर तालुका संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
इंदापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्या साठी शेंडे यांनी प्रयत्न केले आहेत. अनेक प्रश्न मार्गी लागण्यात त्यांना यश आल्यामुळे बकुळा शेंडे यांची अध्यक्षपदाची फेरनिवड झाली.
यावेळी संघटनेची इंदापूर तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.कार्यकारणी पुढीलप्रमाणे.. कार्याध्यक्ष – स्वाती मांढरे, शोभा शिरसाट, खजिनदार- सुनीता कदम, सचिव – चित्रा नाडगौडा, सल्लागार – मंदा खारतोडे,शकुंतला भोसले, सीमा खामगळ, कार्यकारिणी सदस्य – सुमन मदने, सविता कणसे, सुनंदा करे, राजश्री भिसे, पूजा पवार, सुनिता घोगरे, संगीता पवार, अंजली दीक्षित, लतिका बंडगर, छाया भोंग, संध्या नलवडे,
वैशाली गार्डे, दिपाली मिसाळ, रेखा चव्हाण, हसीना शेख, निशा चव्हाण, अलका माने, सविता भिंगारदिवे, निर्मला खुटाळे, सुरेखा निंबाळकर, दक्षता ढावरे, मीना इंगवले, मीरा काळेल, मेघा भोंगळे, नंदा गोरे, नूरजान शेख, साधना सोलनकर..