दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड : तालुक्यातील नानगाव परिसरात केडगाव महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वीज चोरी करणार्यांवर धडक मोहीम राबवली. तब्बल 16 जण विज चोरी करीत असल्याचे आढळून आले. त्याच्यांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता एस.आर.मालपे यांनी दिली. दरम्यान या कारवाईत काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महावितरण विभागाच्या पथकाला नानगांव परिसरातील काही ग्राहक घरी मीटर असूनही लघु दाब वाहिनीवर आकडा टाकून वीज चोरी करताना आढळून आले. काही ग्राहकांकडे महावितानाच्या कंपनीची सर्व्हिस वायर मिळून आली आहे.
बऱ्याच ठिकाणी सर्विस वायर ला टॅब करून वीज वापर सुरू असल्याचे दिसून आले. काहींनी मीटर मध्ये छेडछाड केल्याचे ही पथकास निदर्शनास आले. त्यांच्यावर कारवाई ही केली आहे. तसेच काही लोकांचे तर कित्येक वर्ष मीटर नसुनही वीज चालू आहे.
काहींनी मीटर थेट जोडला आहे. या कारवाईत घरगुती व व्यावसायिक मिळून तब्बल 16 ग्राहकांवर कारवाईही केली असून 25 हजार ते 2 लाखापर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच दंड न भरल्यास वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती मालपे यांनी दिली.
केडगाव महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके, उप कार्यकारी अभियंता एस.आर मालपे, पारगांव विभागाचे कनिष्ठ अभियंता एच.बी.मोरे, तारतंत्री संतोष बनसोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
एस. आर. मालपे, उपकार्यकारी अभियंता, केडगाव – कोणत्याही ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार, सर्विस वायरला टॅब लाऊन वीज चोरी करू नये. ज्या व्यक्तींनी अद्याप ज्यांनी वीज जोडणी घेतले नाही त्यांना त्वरित कनेक्शन दिली जाईल.