मुंबई : महान्यूज लाईव्ह
वाढदिवस आणि केक यांचे समीकरण अगदी अतूट झालं असलं, तरीदेखील केक कापण्याची सुद्धा काही एक प्रथा असते. मुंबईतील कांदिवलीत मात्र सूर्या नावाच्या व्यक्तीने चक्क 550 केक कापून वाढदिवस साजरा केला.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता.
या केक कापण्याच्या आणि वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीची सध्या समाज माध्यमावर चर्चा सुरू असून कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून या व्यक्तीवर पोलीसांकडून कारवाईची शक्यता आहे.
मुंबईतील कांदिवलीतील पश्चिम भागात स्टेशनजवळ चक्क 550 केक कापून या सूर्या नावाच्या व्यक्तीने आपला वाढदिवस साजरा केला. सध्या हा विडिओ वायरल झाला असून, सध्या हा विडिओ चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान या सूर्या नावाच्या व्यक्तीने या संदर्भात माहिती दिली.
मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतो. अनेक स्वयंसेवी संस्था माझ्याशी निगडित आहेत, दरवर्षी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन वाढदिवस साजरा करतो, मात्र यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून एकाच ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वांनी एका ठिकाणी वाढदिवस साजरा केला. हे केक कापून आम्ही गोर गरीब मुलांना वाटले आहेत असे त्यांनी सांगितले.