माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. १३ – ड्रग्स तस्कराला पुढील तपासासाठी राजगड पोलिसांनी गोव्यात नेले होते. मात्र शौचालयाचा बहाणा करून आरोपीच पळून गेला. मात्र पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिसांनी जंग जंग पछाडून बारा तासांच्या अथक तपासादरम्यान जंगलात लपून बसलेल्या मुस्ताकीसह आणखी एका आरोपीला अटक केली असून कार्यकुशलतेवर ओढवलेली नामुष्की राजगड पोलिसांनी पुन्हा दूर केली आहे.
म्हापसा येथे नेण्यात आलेला मुस्ताकी रज्जाक धुनिया या पळून गेलेल्या नेपाळी तस्कराला पुन्हा गोव्यातून पकडले असून दिनेश मधुकर नाईक वय 38 याला गोवा येथील अंजूना बीचमधून राजगड पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून तपासाअंती तो या गुन्ह्यात निष्पन्न झाल्याने राजगड पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणात बाबुली निरंजन नायर वय 25 व सुकांता निरंजन नायर वय 21 या दोन ओडीसा तरुणींना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली असून या गुन्ह्यात आरोपींची संख्या चार झाली आहे.
तपासासाठी गोव्यात नेलेला ड्रग्स तस्कर मुस्ताकी हा शौचाला गेला होता, मात्र पोलिसांची नजर चुकवून तो शेजारील असलेल्या घनदाट जंगलात शिरला. पहाटेचा अंधार असल्याने पोलिसांना तो दिसून आला नाही. त्यानंतर दुपारी दबा धरुन बसलेला होता. दुपारच्या सुमारास हा जंगलातून बाहेर पडला. यावेळी त्याने आणि एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागून फार होत असताना पुणे ग्रामीण पोलीस आणि गोवा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्याला पकडले.
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, हवालदार संतोष तोडकर, महेश खरात, शरद धेंडे आणि पुणे गुन्हे शाखेचे उपनिरिक्षक अमोल गोरे,अमोल शेडगे, मंगेश भगत, पुनम गुंड, सुजाता कदम यांनी मोठ्या शिताफीने दोन्ही आरोपींना गोव्यात जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.महाराष्ट्र पुलिस; नाम ही काफी है!
महाराष्ट्र पुलिस; नाम ही काफी है!
राजगड पोलिस ठाण्याच्या आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मुस्ताकी हा तस्कर निसटला होता. त्यावेळी कदाचित त्याने मोठे स्वप्ने पाहिली असतील की, आता कोणाच्या हाताला लागायचं नाही; परंतु आता पुण्याच्या पोलिसांमध्ये ‘अभिनव’ आत्मविश्वास जागा आहे. त्यामुळेच मुस्ताकी असू देत किंवा जुगार अड्ड्यावरचा जुगारी; आता कोणीच पोलिसांपासून वाचू शकत नाही..!