युवराज जाधव : महान्यूज लाईव्ह
सांगली : जिल्ह्यातील जत तालुक्यात उमराणे गावात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमध्ये सावित्री बाबुराव यादव (वय १३ वर्षे) आणि अभिजीत बाबुराव यादव (वय ११ वर्ष( हे दोघे बहिण भाऊ पादत तलावात बुडाले. तलावाच्या गाळात पाय रूतल्याने बाहेर न पडता आल्याने दोघांचाही मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात तालुक्यावर शोककळा पसरली आहे. उमराणी गावातील यादव वस्ती नजीक एक पाझर तलाव आहे. या पाझर तलावात गावातील महिला कपडे धुण्यासाठी येतात. रविवारी दुपारी ही घटना घडली.
ज्यावेळी सावित्री व अभिजित हे दोघे जण त्याच्या आईसमवेत कपडे धुण्यासाठी या पाझर तलावाच्या काठावर आले होते. पाण्यात खेळता-खेळता त्यांचा पाय पाण्यातील गाळात रुतला. त्यातून बाहेर येता आले नाही आणि दोघांचाही मृत्यू झाला.