चव्हाण मोटर्स सोलापूर यांनी केला होते सन्मानाचे आयोजन
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवाभावी वृत्तीने कार्य करत कोरोना रोखण्यासाठी योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान चव्हाण मोटर्स सोलापूर यांनी सन्मान केला. कोरोना योद्ध्यांच्या कार्यास, त्यांचे शौर्य व सेवावृत्तीचा मनापासून आदर करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
चव्हाण मोटर्स सोलापूर यांच्या वतीने कृष्णाप्रिया लॉन्स संग्रामनगर -अकलूज येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, प्रशासन, पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य आणि स्वच्छता कर्मचारी, सामान्य नागरिक, सामाजिक संस्थांनी जे योगदान दिले आहे. तसेच सेवाभावी वृत्तीने कार्य केले आहे. त्याची दखल घेत चव्हाण मोटर्स सोलापूर यांनी हा स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला आहे. असे सांगत कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार, भाजपा सोलापूर जिल्हा संघटक तसेच शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, वरिष्ठ वैज्ञानिक रतन जाधव यावेळी उपस्थित होते. चव्हाण उद्योग समूहाचे शिवप्रकाश चव्हाण, घनश्याम चव्हाण तसेच दिलीप भाटिया, शिवाजी भोसले, शिवाजी सावंत यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.