सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
शेतजमिनीच्या वादावरून भावकीतील दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह चौघांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
यापैकी मोहन शिवाजी बंडगर (रा.मदनवाडी) यांच्या फिर्यादीवरून आबासाहेब सदाशिव बंडगर (वय ५० वर्ष) व कल्याण आबासाहेब बंडगर (वय २५ वर्ष, दोघेही राहणार मदनवाडी तालुका इंदापूर) यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आठ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मदनवाडी गावच्या हद्दीत मोहन बंडगर यांच्या शेतामध्ये घडली. फिर्
यादी मोहन बंडगर व त्यांचा मुलगा नागनाथ हे दोघेजण शेतात गेले असता, त्या ठिकाणी फिर्यादी बंडगर यांचा चुलतभाऊ हा अनाधिकाराने शेतात येऊन बाजारात दगडी लावत असल्याचे पाहिले. तेव्हा नागनाथ याने आपण बांध मोजणी करून घेऊ आणि नंतर हे पाहू आणि सामोपचाराने घेऊ असे म्हटले असता, आरोपी आबासाहेब बंडगर व कल्याण बंडगर या दोघांनी येऊन मोहन व नागनाथ यांच्यावर तलवारीने वार केले.
तसेच लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली, शिवीगाळ केली व जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच नागनाथ याच्या डोक्यात दगड घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. अशी फिर्याद दिल्यामुळे पोलिसांनी आबासाहेब व कल्याण बाबासाहेब बंडगर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या फिर्यादीनुसार बाबासाहेब सदाशिव बंडगर यांनी फिर्याद दिली असून, याप्रकरणी देखील पोलिसांनी नागनाथ मोहन बंडगर व मोहन शिवाजी बंडगर या दोघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना त्यानंतर अर्ध्या तासाने मध्ये साडेचार वाजता झाल्याचे नमूद केले आहे.
यामध्ये मोहन व नागनाथ या दोघांनी शेतामध्ये असलेल्या आबासाहेब यांच्याकडे येऊन शेतातील बांधाची दगडे का हलवली अशी विचारणा केली आणि त्यावर काही बोलायच्या आत त्यांनी हातातील चाकूने आबासाहेब बंडगर यांच्यावर वार केले. त्यामध्ये बाबासाहेब बंडगर व मुलगा कल्याण बंडगर या दोघांवर वार झाल्याने दोघे जखमी झाले आहेत अशा स्वरूपाची फिर्याद पोलिसांकडे दिल्याने पोलिसांनी नागनाथ व मोहन बंडगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.