सांगली : महान्यूज लाईव्ह
आयकर खात्याच्या आज सकाळी अचानक पडलेल्या धाडीनंतर महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी भाजप हा तपास यंत्रणा चालवत असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
आज सकाळी जयंत पाटील यांनी असा आरोप केला की, आम्ही सोमवारी संपूर्ण महाराष्ट्र बंद करणार आहोत अशी घोषणा केल्यानंतर, लागलीच दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी धाडी टाकून एक सनसनाटी निर्माण करण्याचा व महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचा भाजप नेत्यांचा डाव आहे.