बारामती : महान्यूज लाईव्ह
आज सकाळी बारामती तालुक्यातील दोन ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रण यंत्रणेचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली होती. दरम्यान ही ईडीची धाड आहे की केंद्रीय तपास यंत्रणेची धाड आहे यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती मिळाली नाही. परंतु बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील दुध प्रकल्प आणि काटेवाडी या दोन ठिकाणी सकाळी अधिकारी पोचले होते. त्यांनी नक्की काय चौकशी केली किंवा कशासाठी हे अधिकारी पोचले होते याची मात्र माहिती मिळू शकलेली नाही.
या दोन ठिकाणी आज सकाळपासूनच केंद्रीय पोलीस दलाचे अधिकारी पोचले होते आणि ते काही चौकशी करत होते अशी माहिती स्थानिक स्तरावर मिळाली आहे. दरम्यान ही चौकशी कशावरून आहे याची अद्याप कुठलीही माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळालेली नसून या संदर्भात बारामतीत वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहेत.
बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील या उद्योगाची चौकशी करण्याचे कारण काय याचीही माहिती मिळाली नसून याठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांची काही वाहने मात्र पोचलेली आहेत. बारामतीत अचानक आलेल्या या अधिकाऱ्यांमुळे मोठी खळबळ उडाली. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काटेवाडीतही एका साखर कारखान्याच्या संबंधित पदाधिकाऱ्याची चौकशी केली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र याला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.
काटेवाडीतही आज खासगी साखर कारखान्याशी संबंधित एका पदाधिकाऱ्याच्या घरी आज सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक पोहोचले होते. त्यांनी जवळपास दोन ते अडीच तास या ठिकाणी चौकशी केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.