दौंड : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र राज्य ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन 2021 चा अवार्ड हा जयद्रथ आत्माराम आखाडे (रा. तळवडे ता.हवेली जि.पुणे ) यांना देण्यात आला. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून हा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक, कला,अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणारा व्यक्तींचा सन्मान केला जातो. यंदाही संस्थेच्या वतीने दौंड येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. जयद्रथ आत्माराम आखाडे यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव अवार्ड 2021 या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते जयद्रथ आखाडे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे, प्रदेशध्यक्ष रेवनाथ देशमुख, दिनेश पवार आदींसह संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.