नंदुरबार : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शेळद या गावाजवळ बस आणि ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 14 जण जखमी झाले. बस चालकासह आणखी दोन ते तीन जण गंभीर आहेत. अपघातानंतर दोन्ही वाहने पेटल्याने प्रवाशी भाजले गेल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शेळद फाट्याजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात बसचालकाला गंभीर इजा झाली आहे. त्यासोबतच इतरही प्रवाशी जखमी झाले आहे.
दरम्यान, दोन वाहनाच्या धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यामुळे प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी धडपड केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी पाठविले. तर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या अपघातातील जखमींची माहिती अद्याप कळू शकली नाही. बाळापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.