दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
भोर तालुक्यातील नसरापुर येथे 26 सप्टेंबर रोजी झालेल्या ओपन तायक्वांदो स्पर्धेमध्ये वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट ॲकॅडमीच्या स्पर्धकांना यश मिळाले.
प्रेरणा ज्ञानेश्वर मुळीक, वैभवी संदीप भोसले, वैष्णवी संदीप भोसले, श्रीधर विजय गायकवाड, आरोही संदीप भोसले या सर्वांनी सुवर्णपदक पटकावले. तनिष्का संतोष किर्वे, गार्गी संतोष किर्वे या दोघींनी रौप्य पदक मिळवले.
सिद्धेश संतोष मालुसरे व वेदिका महेंद्र येवले या दोघांनी कांस्यपदक मिळवले. या सर्वांना विशाल आबासाहेब कुमठे यांनी प्रशिक्षण दिले. कुमठे यांनी ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट ॲकॅडमी स्थापन करून भोर, वाई, महाड या तीन तालुक्यांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
यातून मुलांना पोलिस, भरती आर्मी भरती, नेव्ही भरती, तायक्वांदो प्रमाणपत्राचा या भरतीसाठी चांगल्या प्रमाणात उपयोग होतो. सर्व शासकीय व निमशासकीय नोकरीत 5℅ आरक्षण ( पोलीस,C.R.P.F, S.R.P.F, स्पेशल फोर्स) इत्यादी सर्व शासकीय नोकरी मध्ये 5% आरक्षण आपण या खेळामधून प्राप्त करू शकतो. ॲकॅडमीने वाई तालुक्यामध्ये प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज, अशा विविध ठिकाणी मुलींना स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे धडे शिकवले व प्रात्यक्षिक करूनही दाखवले.