मुंबई : महान्यूज लाईव्ह
माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात सीबीआयने आता जणू राज्यातील महाविकास आघाडी सरकार भोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. कारण सीबीआयने थेट राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे या दोघांना सीबीआयने समन्स बजावले आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने लुकआऊट नोटीस जारी केलेले आहे. मात्र अजून अनिल देशमुख सीबीआयच्या हाती लागलेले नाहीत.
तीन महिन्यापासून अनिल देशमुख गायब असल्याने सीबीआयने थेट मुख्य सचिवांना आणि पोलिस महासंचालकांना बोलावणे धाडले आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना आणि पोलिस महासंचालकांना बोलावणे म्हणजेच सरकारभोवती थेट फास आवळण्यासारखेच आहे.