बारामती : महान्यूज लाईव्ह
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागाने महात्मा कबीर आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. महाविद्यालयात आॕनलाइन झालेल्या या स्पर्धेचे हे ११ वे वर्ष होते. या स्पर्धेत वरिष्ठ गटातून नागपूरच्या व्ही.एम.बी कॉलेजच्या दिव्या शर्मा आणि कनिष्ठ गटातून वसईच्या उत्कर्ष महाविद्यालयाचा वेदांत आर्य हे दोघे विजेते ठरले. या स्पर्धेत राज्यभरातून १२० विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले. या वेळी बोलताना ते म्हणाले की, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असून तिचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे. हिंदी साहित्य महाविद्यालयीन युवकांपर्यंत पोहोचले पाहिजे या हेतूने या महाविद्यालयात दरवर्षी महात्मा कबीर हिंदी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. राज्यभरातून दरवर्षी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळतो. गेली दोन वर्षे ही स्पर्धा कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन घ्यावी लागत असूनही तिला प्रतिसाद चांगला मिळत आहे. हे कौतुकास्पद आहे.
दरम्यान या स्पर्धेत वरिष्ठ विभागासाठी १. तालाबंदी के सामाजिक परिणाम., २. हिंदी में रोजगार की उपलब्धीया., ३. आझादी का अमृतमहोत्सव. हे विषय देण्यात आले होते. तर कनिष्ठ विभागासाठी
१.भक्ति के महान प्रवर्तक संत कबीर, २. राष्ट्रीय एकत्मता और हिंदी. ३. कोरोना विश्व का भयानक संकट . असे विषय देण्यात आले होते.
वरिष्ठ आणि कनिष्ठ विभागासाठी प्रत्येकी ७ हजार रुपये, ५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ३ हजार व उत्तेजनार्थ १ हजार रुपये अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली होती. वरिष्ठ गटात, १. दिव्या शर्मा , व्ही.एम.बी कॉलेज ,नागपूर. २. साक्षी मराठे ,सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे. 3. आरती मिर्झापुरे ,गो.से. वाणिज्य महाविद्यालय ,वर्धा. ४.अनामिका पिसाळ, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड असे विजेते ठरले.
कनिष्ठ गटासाठी १. वेदांत आर्य, उत्कर्ष महाविद्यालय ,वसई, २.आकांक्षा सिंह, विल्सन महाविद्यालय ,मुंबई, ३.निशा तवले, सारस्वत कॉलेज ,सावनेर, ४.मायावती पाईकराव, आदर्श महाविद्यालय , हिंगोली यांनी अनुक्रमे प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले.
या स्पर्धेचे परीक्षण सौ. ज्योती जगताप , डॉ. जयश्री बागवडे व प्रा. स्नेहलता खडके यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. शामराव घाडगे , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अंकुश खोत ,पर्यवेक्षिका डॉ. उत्कर्षा ठाकरे, कार्याध्यक्ष प्रा. संजय आरण्ये, हिंदी विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र खैरनार, डॉ मंगल ससाणे, डॉ. मिलिंद कांबळे, प्रा. स्नेहलता खडके आणि संयोजन समितीतील सर्व सदस्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.