युवराज जाधव : महान्यूज लाईव्ह
सोनी (ता मिरज) येथे ३० सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पोषण आहार माह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोनी येथील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहभाग घेतला होता.
राष्ट्रीय पोषण माह या निमित्ताने सर्व बालके व त्यांचे पालक यांना आहाराचे महत्व आपल्या सर्वांगीण वाढीसाठी कसे आहे ? हे विविध देखाव्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले.
या निमित्ताने सर्व अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी विविध पदार्थांचे शरीरासाठी काय महत्व आहे, याची आकर्षक माहिती तयार केली होती. येथील मारुती मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितेचे सभापती दिनकर पाटील, पंचायत समिती सदस्य रंगराव जाधव, जिल्हा परिषद सदस्या मनीषा पाटील, सरपंच राजेंद्र माळी, पंचायत समिती सदस्य मंगल नरुटे, पोलीस पाटील प्रज्ञा पाटील तसेच राष्ट्रवादी तालुका अध्यक्षा रुकसाना मुजावर, सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सौ बेबीताई जाधव, चंपताई जाधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात शारदा चव्हाण, बिस्मिल्ला मुल्ला, मंगल पाटील रेखा पवार, सुवर्णा पाटील , नंदा पाटील, सुचिता पाटील, सिंधू जाधव, भागीरथी पाटील, अभिदा मुलाणी, अमीना मुलाणी, रुक्मिणी शेलार यांनी सहभाग दिला.